श्राद्ध कर्म विधि मराठी | Shradh Karm Vidhi

मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी श्राद्ध कर्म विधि मराठी PDF / Shradh Karm Vidhi in Marathi PDF अपलोड केली आहे. चातुर्मासात येणारी अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक, व्यवहारी आणि आरोग्याच्या दृष्टिने महत्त्व आहे. तसेच भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षालाही आहे. भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षातील श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन असे विधी केले जातात.
पितृपक्ष किंवा पितृपंधरवड्यात पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. पितृपक्षात आपल्या वारसांना भेटण्याची संधी पूर्वजांना प्राप्त होते. पिंडदान, अन्न आणि जल ग्रहण करण्याची मनोकामना घेऊन पूर्वज पृथ्वीलोकात येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

श्राद्ध कर्म विधि मराठी PDF | Shradh Karm Vidhi in Marathi PDF

1. काळे तीळ 2. कुतप (मुहूर्त) 3. जानवे 4. चांदी 5. पांढरी फुले 6. दक्षिण दिशा.
काळ्या तिळाने युक्त पाण्याने पिंडाची पूजा व त्यावर सिंचन करावे. हे शक्य नसल्यास तिळाने तर्पण करावे (पृथ्वीवर पितरांना पाणी देणे.) पितर असे म्हणतात, की माझ्या कुळात कोणी असा बुद्धीमान माणूस जन्म घेईल जो पैशाच्या मोहाला बळी न पडता आमच्यासाठी पिंडदान करेल. पैसा असताना आमच्यासाठी रत्न, वस्त्र तसेच सर्व योग्य वस्तूंचे दान करेल किंवा अन्न, वस्त्र यासारखे दान श्राद्धकाळात श्रद्धापूर्वक करेल व शांत चित्ताने ब्राह्मणाला यथाशक्ती जेवायला घालेल किंवा अन्नदान करण्यास अमसर्थ असताना फळ, कंदमुळे भाज्या, दक्षिणा देईल व हेही करण्यास असमर्थ असताना हात जोडून एक मूठभर काळे तीळ देईल किंवा आमच्यासाठी पृथ्वीवर श्रद्धापूर्व सात-आठ तिळांनी युक्त पाण्याचे तर्पण वर करून दुपारी आदराने व भक्तीपूर्वक या मंत्राचे उच्चारण करेल.
नमेऽस्ति वित्तं न धनं
न चान्यच्छाध्दस्य योग्यं स्वपितृन्नतोडसि।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतो
भुजौ ततो वर्त्मीन भारुतस्य।
श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीस न दिल्यास, पारंपरिक पद्धत न पाळल्यास, योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्ध फळ मिळत नाही. जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही, त्यावर दुष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुरग्रहण करतात असे म्हटले जाते.
याच प्रकारच्या श्राद्धाचा अधिकारी वामनाने बळीराजाला बनवले. तसेच राम जेव्हा सीतेसह रावणाचा संहार करून परत आले त्यावेळी सीतेने सांगितले की, त्रिजटा आपली भक्ती करते. तेव्हा रामाने त्या राक्षसीला वर दिला की, ज्या श्राद्ध करणार्‍या व्यक्तीच्या घरात चांगली सामग्री, योग्य वि‍द्या व पात्र नाही, सर्व योग्य असतानाही श्राद्ध करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो. याचप्रमाणे शंकराने वासुकी नागाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन वर दिला ‘नागराज, ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही, योग्य दक्षिणा दिली नाही, देवाब्राह्मणांच्या साक्षीचे उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत. श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो’.
ब्राह्मणाला काही दिले जात असेल तर त्यावेळी कोणाला मनाई करू नये. दान देणार्‍याला थांबवणार्‍यास गुरुहत्येचे पातक लागते. एवढेच नाही तर अशा व्यक्तीकडून दिलेला पदार्थ देव, अग्नी व पतरही ग्रहण करत नाहीत. श्राद्धाचे दान अपात्र, नास्तिक, गुरुद्रोहीला देण्यापेक्षा पाण्यात सोडावे.
You may also Like :

 
Here you can download the श्राद्ध कर्म विधि मराठी PDF / Shradh Karm Vidhi in Marathi PDF by click on the link given below.

Leave a Comment