शनि प्रदोष व्रत कथा मराठी | Shani Pradosh Vrat Katha

प्रदोष व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. शनिवारी पडणाऱ्या प्रदोष व्रताला शनि प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शंकरासोबत शनिदेवाचीही पूजा केली जाते. शास्त्रानुसार शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळे कपडे, तेल, उडीद डाळ अर्पण करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, शनि प्रदोष व्रताच्या दिवशी या वस्तू भगवान शनिदेवाला अर्पण केल्याने भक्तांवर त्यांचे आशीर्वाद पडतात. येथून तुम्ही Shani Pradosh Vrat Katha in Marathi PDF / शनि प्रदोष व्रत कथा पीडीएफ मराठी भाषेत अगदी सहज डाउनलोड करू शकता. प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाला कसे प्रसन्न करावे ते जाणून घ्या-

शनि प्रदोष व्रत कथा मराठी PDF / Shani Pradosh Vrat Katha in Marathi PDF :

पौराणिक कथेनुसार प्रदोष तिथीच्या दिवशी शिव शंकराने या सृष्टीची निर्मिती केली होती. ८ मे रोजी शनि प्रदोषाच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. यादिवशी अमृतकाळ आणि विजय मुहूर्त यांच्यासोबत प्रितीयोग देखील तयार होत आहे. या शुभ योगांमध्ये मंगलकार्य करणे अतिशय शुभ मानले जाते. ज्योतिष आचार्यांच्या म्हणण्यानुसार अमृतकाळ आणि विजय मुहूर्तावर केले जाणारे प्रत्येक काम शुभ मानले जाते तसेच त्यात यशप्राप्तीही होते. प्रिती योगामध्ये प्रेमविवाह केल्यास किंवा रुसलेल्या मित्रमैत्रिणीला किंवा नातेवाईकांचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. या योगामध्ये केलेल्या कामात मानसन्मान आणि यशप्राप्ती होते.
 

शनि प्रदोष व्रताचे महत्त्व / Shani Pradosh Vrat Significance :

स्कंदपुराणात सांगितल्याप्रमाणे शनि प्रदोष तिथीला शिव शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. हे व्रत स्त्रिया आणि पुरुष दोघे करू शकतात. तसेच हे व्रत केल्यास आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती करता येते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. प्रदोष व्रत केल्यास संसारिक सुखाची प्रप्ती होते तसेच अपत्यप्राप्तीचा आशीर्वादही मिळतो. शनिवारी येणाऱ्या शनि प्रदोषाच्या दिवशी शिव शंकरासोबत शनिदेवाचीही पूजा अर्चा करावी आणि शनि देवाशी संबंधित वस्तूंचे दान करावे. असे केल्यास आपल्या कुंडलीतील शनि ग्रहाची दशा सुधारते आणि शनिच्या साडेसाती आणि दोषापासून मुक्ती मिळते.
 

शनि प्रदोषाची पूजा विधी / Shani Pradosh Vrat Puja Vidhi in Marathi :

  • शनि प्रदोषाच्या दिवशी शनि स्तोत्राचे वाचन करावे.
  • यादिवशी सकाळी स्वच्छ कपडे घालून शिव शंकर आणि माता पार्वतीची पूजाअर्चा करावी.
  • त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र,भांग,धोतऱ्याचे फूल घालून दिवा लावावा आणि नैवेद्य अर्पण करावा.
  • त्यानंतर आरती करून शिव चालीसा वाचावी. प्रदोष तिथी शनिवारी आल्यास एका वाटीत तिळाचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहावा आणि शनिदेवाची प्रार्थना करावी.
  • मग ते तेल शनि देवाचे दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीला दान करावे.त्यानंतर काळे उडीद,काळे तीळ आणि जव यांचे दान करावे.
  • शनि प्रदोषाच्या संध्याकाळी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घालावी त्यामुळे तुमचे नशीब उजळेल.

 

शनिदेवाची आरती / Shani Dev Aarti Lyrics in Marathi :

जय जय श्री शनीदेवा |

पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळतो |

मनोभावे करुनी सेवा || धृ ||

सुर्यसुता शनिमूर्ती |

तुझी अगाध कीर्ति एकमुखे काय वर्णू |

शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||

नवग्रहांमाजी श्रेष्ठ |

पराक्रम थोर तुझा ज्यावरी कृपा करिसी |

होय रंकाचा राजा || जय || २ ||

विक्रमासारिखा हो |

शककरता पुण्यराशी गर्व धरिता शिक्षा केली |

बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||

शंकराच्या वरदाने |

गर्व रावणाने केला साडेसाती येता त्यासी |

समूळ नाशासी नेला || जय || ४ ||

प्रत्यक्ष गुरुनाथ |

चमत्कार दावियेला नेऊनि शुळापाशी |

पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||

ऐसे गुण किती गाऊ |

धणी न पुरे गातां कृपा करि दिनांवरी |

महाराजा समर्था || जय || ६ ||

दोन्ही कर जोडनियां |

रुक्मालीन सदा पायी प्रसाद हाची मागे |

उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||

जय जय श्री शनीदेवा |

पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळीतो |

मनोभावे करुनी सेवा ||

 
You can download शनि प्रदोष व्रत कथा मराठी pdf / Shani Pradosh Vrat Katha in Marathi PDF by clicking on the following link.
तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करून श्री शनि प्रदोष व्रत pdf डाउनलोड करू शकता.

Leave a Comment