रेणुका माता आरती | Renuka Mata Aarti

अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो। देवीची उपासना, उपवास, पूजा, उपासना, नमस्कार, जप, होम-हवन देशभर आपल्या स्वतःच्या पद्धती, कुळ, रीतिरिवाज आणि परंपरेनुसार केले जाते। रेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो। रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला। यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला।
रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले। जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते। लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते। रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे।
 

रेणुका मातेची आरती जय जय जगदंबे / Renuka Mata Aarti Lyrics in Marathi

जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे | जय जय || धृ ||

अनुपम स्वरुपाची तुझी धाटी | अन्य नसे या सृष्टी |

तुज सम रूप दुसरे, परमेष्टी | करिता झाला कष्टी |

शशीरस रसरसला ,वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी |

सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी |

गजमुखी तुज स्तविले हेरंबे | मंगल सकळारंभे || जय जय || १ ||

कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी |

नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी |

समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी |

शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी |

भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे || जय जय || २ ||

कंकणे कनकाची मनगटी | दिव्य मुद्या दश बोटी |

बाजूबंद जडे बाहुबटी | चर्चुनी केशर उटी | सुगंधी पुष्पांचे हार कंठी |

बहु मोत्यांची दाटी | अंगी नवी चोळी, जरीकाठी | पीत पितांबर तगटी |

पैंजण पदकमळी, अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||

साक्षप तू क्षितिच्या तळवटी | तूचि स्वये जगजेठी |

ओवाळीत आरती, दिपताटी | घेऊनी कर संपुष्टी |

करुणामृत हृदये, संकटी | धावसी भक्तांसाठी |

विष्णूदास सदा, बहुकष्टी | देशील जरी नीजभेटी |

तरी मग काय उणे, या लाभे | धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||

Benefits of Reciting Renuka Mata Aarti

  • This Aarti brings health, wealth and prosperity.
  • You can gain confidence by reciting this Aarti.
  • Goddess saves you from enemies if you recite it regularly.
  • You can seek the special blessings of Goddess Renuka by this Aarti.
  • There are uncountable spiritual benefits of worshipping Goddess Renuka.

You can download Renuka Mata Aarti in Marathi PDF by clicking on the following download button.

Leave a Comment