New Guidelines For Lockdown in Maharashtra / Break the Chain

राज्य सरकारने राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे असून हा कडक लॉकडाउन १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. त्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत राज्य सरकारने आज नवे नियम जाहीर केले आहेत. तसेच हे नियम न पाळल्यास दंड देखील ठोठावण्यात येणार आहे.
कार्यालयांमधील उपस्थितीबाबत नियम:
• राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
• इतर कार्यालायांना देखील एकूण कर्मचारी संख्येच्या १५ टक्के इतक्याच कर्माचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
• अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कमीत कमी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांनी आपल्या रकर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असणार नाही याची काळजी घेणे अनिवार्य असेल.
• अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित असणे गरजेचे. मात्र डिलिव्हरी करण्याच्या कामासाठी कर्मचारी वर्ग गरजेपोटी १०० टक्के करता येऊ शकणार आहे.
राज्यात कोरोनाच्या धर्तीवर लागू होणाऱ्या नव्या नियमावलीअंतर्गत ‘ब्रेक दि चेन’ नियमावलीच्या दृष्टीनं, अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरु असणार आहेत. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकानं बंद असतील. सायंकाळपर्यंत याबाबतची अधिकृत नियमावली समोर येणार आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्या कमी करण्यात आली असून, हे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर आणलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर, सार्वजनिक वाहतुकीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच परवानगी दिली जाऊ शकते.

Leave a Comment