Dear readers, here we are presenting Laxmi Puja Vidhi PDF in Marathi for all of you. There are many people who are suffering from poverty and financial crisis. if you are one of them, you can observe the Shri Lakshmi Pujan in front of Goddess Lakshmi Ji to please her and seek her blessings to overcome all kinds of financial problems.
हिंदू धर्मात उपवास आणि उपवासाचे अनेक प्रकार आहेत. लक्ष्मीमातेचे व्रत हे देखील अशाच व्रतांपैकी एक आहे. लक्ष्मी व्रत खूप लोकप्रिय आहे. हे व्रत फार पूर्वीपासून पाळले जात आहे. माता वैभव लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीच्या जीवनात धन-समृद्धीचा वर्षाव होतो. जर तुम्ही देखील तुमच्या जीवनातील आर्थिक समस्यांमुळे खूप त्रस्त असाल आणि आता त्या संकटातून बाहेर पडायचे असेल तर माता लक्ष्मीजीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक करा. या व्रताच्या यशस्वितेसाठी व्रताच्या वेळी श्री लक्ष्मी व्रत कथेचे पठण व पाठ करावे.
लक्ष्मी पूजन कसे करावे याची माहिती / Laxmi Puja Vidhi in Marathi PDF
- वेळ: या पद्धतीने महालक्ष्मी पूजन करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच त्याला संस्कृतचे ज्ञान नाही ती व्यक्ती हा विधी करू शकते.
- विधी: आपण विकत घेतलेल्या नवीन प्रतिमेची, मूर्तीची पूजा करण्यासाठी विधी निर्देश व मंत्रांचा भावार्थ मराठीत प्रस्तुत केला जात आहे. ज्यामुळे संस्कृतच्या अडचणी दूर होऊ शकतील.
- पूजन सामग्री: आवश्यक ती पूजन सामग्री पूजेपूर्वीच मांडून ठेवा.
- मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
- वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
- गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
- दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करा.
- आसन: कुशाच्या किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडावर बसून पूजा करू नये.
- पूजन सामग्री: पूजन सूरू करण्यापूर्वी पूजेचे सर्व साहित्य आपल्याजवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
- वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
- मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री महालक्ष्मीची प्रतिमा एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा. (Note : For complete Lakshmi Puja Vidhi Kindly download the PDF)
लक्ष्मी देवीची आरती मराठी मध्ये / Lakshmi Aarti in Marathi Lyrics PDF
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥
अमृत भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥
चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥
You can download Laxmi Puja Vidhi in Marathi PDF by clicking on the following downloading button.